Yuva Sena Fort Competition Ratnagiri: युवासेना रत्नागिरी शहरातर्फे भव्य शहरस्तरीय गड-किल्ले बांधणी व सजावट स्पर्धा २०२६; प्रवेश विनामूल्य

Yuva Sena Fort Competition Ratnagiri: युवासेना रत्नागिरी शहरातर्फे भव्य शहरस्तरीय गड-किल्ले बांधणी व सजावट स्पर्धा २०२६; प्रवेश विनामूल्य

‘शिवरायांचा इतिहास जपूया, युवा कलागुणांना वाव देऊया’ ब्रीदवाक्य; विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख पारितोषिके

Yuva Sena Fort Competition Ratnagiri: छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि स्वराज्याच्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, तसेच तरुणांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने युवासेना रत्नागिरी शहराच्या वतीने भव्य शहरस्तरीय गड-किल्ले बांधणी व सजावट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. उदय रवींद्र सामंत आणि राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.

‘शिवरायांचा इतिहास जपूया, युवा कलागुणांना वाव देऊया’ हे ब्रीदवाक्य घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील युवक, बालके, विविध सांस्कृतिक मंडळे आणि नागरिकांना गड-किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्याची संधी मिळणार आहे. ऐतिहासिक गड-किल्ल्यांची रचना, त्यांचे लष्करी महत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न युवासेनेकडून केला जात आहे.

Arihant 4

५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान नोंदणीची संधी
ही स्पर्धा केवळ रत्नागिरी शहरापुरती मर्यादित असून, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही (प्रवेश विनामूल्य). स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५ ते ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नावनोंदणी करता येणार आहे. त्यानंतर १२ ते १४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान परीक्षक मंडळाकडून प्रत्यक्ष किल्ल्यांच्या ठिकाणी जाऊन परीक्षण केले जाईल.

या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांच्या किल्ल्यांचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रसिद्ध करून त्यांच्या कलागुणांचा गौरव केला जाणार आहे.

आयोजकांचे आवाहन व संपर्क
युवासेना उपशहर प्रमुख सर्वेश शेलार आणि रोहित मायनाक यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. रत्नागिरी शहरातील जास्तीत जास्त युवकांनी, गणेशोत्सव व बाल मित्र मंडळांनी आणि नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शिवरायांच्या इतिहासाचा वारसा जपण्याच्या या उपक्रमात सामील व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

स्पर्धा नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:

७३०४२६२९०४

७०३८२२८८८५