Census 2027 Maharashtra Population Enumeration Training: जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी ‘यशदा’ येथे चार दिवसीय प्रशिक्षण संपन्न; महाराष्ट्रात २५ जानेवारीपासून सुरू होणार लोकसंख्या गणना

Census 2027 Maharashtra Population Enumeration Training: जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी 'यशदा' येथे चार दिवसीय प्रशिक्षण संपन्न; महाराष्ट्रात २५ जानेवारीपासून सुरू होणार लोकसंख्या गणना

६ महसुली विभागांतील १२० मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण पूर्ण; १ ते २५ जानेवारी दरम्यान होणार स्व-गणना प्रक्रिया

Census 2027 Maharashtra Population Enumeration Training: आगामी जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील ‘लोकसंख्या गणना’ प्रक्रियेसंदर्भात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे आयोजित करण्यात आलेला चार दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम ५ नोव्हेंबर २०२६ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील सहा महसुली विभागांमधून सहभागी झालेल्या १२० मास्टर ट्रेनर्ससह, जनगणना संचालनालय, महाराष्ट्र येथील २८ अधिकाऱ्यांनी या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणात सहभाग घेतला.

हे प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. पहिले सत्र (बॅच I व II) २८ ते ३१ ऑक्टोबर २०२६ आणि दुसरे सत्र (बॅच III व IV) २ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पार पडले. या मास्टर ट्रेनर्सची नियुक्ती राज्य जनगणना नोडल अधिकारी तथा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांच्यामार्फत करण्यात आली असून, यामध्ये महसूल प्रशासन, नगरपालिका, शैक्षणिक व तांत्रिक संस्थांमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

प्रशिक्षणाचे स्वरूप व PRAMAN कार्यपद्धती
या प्रशिक्षण सत्रात जनगणनेच्या विविध संकल्पना, प्रश्न क्र. १ ते ४० ची प्रश्नावली, जनगणनेसाठीचे विशेष मोबाईल ॲप, स्व-गणना पद्धत आणि प्रगणक गटाचे मांडणी दर्शक नकाशे (Layout Maps) यांवर सैद्धांतिक व प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, PRAMAN कार्यपद्धतीवर आधारित जबाबदारी आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे माहिती संकलनाचा सराव करून घेण्यात आला.

Pednekar sankul

केंद्र शासनाच्या सहसचिव तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, महाराष्ट्र डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी मास्टर ट्रेनर्सना मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यात जनगणनेचा पहिला टप्पा ‘घरयादी व घरगणना’ अत्यंत यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात मास्टर ट्रेनर्स हे राज्यातील फील्ड ट्रेनर्सना प्रशिक्षण देतील, जे पुढे घरोघरी जाऊन माहिती गोळा करणाऱ्या सुमारे २.८२ लाख प्रगणक व पर्यवेक्षकांना सक्षम करतील.

महाराष्ट्रातील जनगणनेचे अधिकृत वेळापत्रक
केंद्र शासनाच्या ३० ऑक्टोबर २०२६ च्या अधिसूचनेनुसार (S.O. 5913(E)) महाराष्ट्रातील लोकसंख्या गणनेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे:

स्व-गणना कालावधी (Self-Enumeration): १० जानेवारी ते २४ जानेवारी २०२७

प्रत्यक्ष घरोघरी जाऊन लोकसंख्या गणना: २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७

फेर तपासणी फेरी (Revisionary Round): १ मार्च ते ५ मार्च २०२७

जनगणनेचा संदर्भ वेळ: १ मार्च २०२७ रोजीची मध्यरात्र (००:०० वाजता)