रत्नागिरी : आर्ट सर्कलचा जानेवारीत संगीत महोत्सव

रत्नागिरी : आर्ट सर्कलचा शास्त्रीय संगीत महोत्सव दि. २४, २५ आणि २६ जानेवारी २०२५ या तीन दिवसांमध्ये होणार आहे.

दि. २४ जानेवारी रोजी बेंगलोरचे सुप्रसिद्ध गायक सिद्धार्थ बेलामनू महोत्सवाचा प्रारंभ करणार आहेत. रत्नागिरीचा वरद सोहनी सिद्धार्थ यांना संवादिनी साथ करणार आहे, तर प्रणव गुरव तबला साथ करणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी रात्री साडे आठ वाजता पं. योगेश समसी यांचा तबला सोलो होणार आहे. त्यांच्यासोबत पुण्याचे मिलिंद कुलकर्णी संवादिनीवर लेहरासाथ करणार आहेत.
दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध युवा व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर आणि बासरीवादक एस. आकाश आपल्या सहवादनाने प्रारंभ करतील.

या सहवादनाला तबला साथ विवेक पंड्या करणार आहेत. या दिवासाचा समारोप बेंगलोरच्या शास्त्रीय गायिका विदुषी भारती प्रताप करतील. त्यांना पं. अजय जोगळेकर संवादिनी साथ तर बेंगलोरचे योगीश भट तबला साथ करणार आहेत.

दि. २६ रोजी ७ वाजता संतूर बादक डॉ. शंतनू गोखले करणार आहेत. त्यांना दिल्लीचे सुप्रसिद्ध तबला वादक यशवंत वैष्णव साथ संगत करणार आहेत.

JMBR

महोत्सवाचा समारोप हुबळीचे सुप्रसिद्ध गायक पं. जयतीर्थ मेऊंडी करणार आहेत. त्यांना यशवंत वैष्णव तबला साथ तर अजय जोगळेकर संवादिनीसाथ करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे याही महोत्सवाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे, आवाहन आर्ट सर्कल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 23/Nov/2024