जाकिमिर्‍या येथील खाडीच्या पाण्यात आढळला प्रौढाचा मृतदेह

रत्नागिरी : शहरानजीकच्या जाकिमिर्‍या येथील खाडीच्या पाण्यात प्रौढाचा मृतदेह आढळून आला. ही घटना गुरुवार 12 डिसेंबर रोजी दुपारी 1.45 वा. सुमारास उघडकीस आली.

नंदकुमार गोपाळ गवाणकर (55,मुळ रा.चवे होलपाट वाडी सध्या रा.जाकिमिर्‍या,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

बुधवार 11 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वा. सुमारास जाकिमिर्‍या खाडीच्या पाण्यात तोल जाउन ते बेपत्ता झाल्याबाबत शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी जाकिमिर्‍या स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावरील मोरवा या ठिकाणी तेथील स्कुबा ड्रायव्हिंगच्या लोकांना तेथील खाडीच्या पाण्यात गवाणकर यांचा मृतदेह मिळून आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 14-12-2024

Shanti real estate 1