नागपूर- मडगाव गाडी ५ तास उशिरा धावली

खेड : कोकण मार्गावरून धावणारी नागपूर- मडगाव गुरूवारी तब्बल ५ तास उशिराने मार्गस्थ झाली. प्रवाशांची रखडपट्टी झाली.

ही गाडी विलंबाने धावण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. या गाडीपाठोपाठ अन्य ५ गाड्या विलंबाने रवाना झाल्या. उधना – मंगळूरसह सीएसएमटी- मडगाव मांडवी एक्स्प्रेस १ तास उशिराने धावल्या. दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस १ तास १० मिनिटे, तर एर्नाकुलम-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे विलंबाने मार्गस्थ झाली. एक्स्प्रेससह मंगळूर-सीएसएमटी केरळा संपर्कक्रांती एक्स्प्रेस १ तास उशिराने रवाना झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:49 PM 14/Dec/2024