कुवारबाव येथे घरफोडी

रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव येथील बंद घर फोडून अज्ञाताने रोख ४० हजार रुपये चोरुन नेले. ही घटना शुक्रवार १३ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.१५ वा. सुमारास घडली आहे. या बाबत सिध्दार्थ रामचंद्र कदम (वय ६३) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, शुक्रवारी सिध्दार्थ कदम आपल्या कुटुंबासह काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात कोणीही नसल्याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने त्याच्या घराच्या सेफ्टी डोअरचे कुलूप व मेन डोअरच्या दरवाज्याचा कडी- कोयंडा स्कु ड्रायव्हर व लोखंडी कटावनीने उचकटला. त्या नंतर दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश करत देव्हाऱ्यातील देवाच्या पुस्तकात कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेले रोख ४० हजार रुपये चोरुन नेले. दुपारी १२.१५ वा. सुमारास सिध्दार्थ कदम घरी परतले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. त्यांनी तातडीने घरात जाउन पाहिल्यावर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 16/Dec/2024