रत्नागिरी : ‘सारथी’मार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

रत्नागिरी : सारथी संस्थेच्या विभागीय कार्यालयाच्या कोल्हापूर उपकेंद्रामार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर मंगळवारी १७ डिसेंबर रोजी येथील मिस्त्री हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार आहे. स्वत:ला ओळखा व करिअर निवडा, ताणतणाव व्यवस्थापन अभ्यास कौशल्य, परीक्षेला सामोरे जाताना, या विषयांवर विठ्ठल कोतेकर समुपदेशन करणार आहेत. विज्ञान शाखेतील करिअर, वाणिज्य क्षेत्रातील करिअर या विषयावर विक्रांत जाधव आणि कला शाखेतील करिअर ललित कला क्षेत्रातील करिअर या विषयांवर इ. एन. चौगुले समुपदेशन करणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी, पालक शंखासमाधान आणि दुपारी ३ वाजता या शिबिराचा समारोप होणार आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 17-12-2024

Amey jwelrs