जिल्हा बँकेच्या लांजा शाखेच्या वतीने आमदार किरण सामंत यांचा सत्कार

लांजा : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक क्षेत्रीय कार्यालय लांजाच्या वतीने लांजा-राजापूर-साखरपा आ. किरण सामंत यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

बँकेच्या माध्यमातून लांजा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सुरू असलेल्या कामांबाबत किरण सामंत यांनी माहिती जाणून घेतली. तालुक्यातील सहकार क्षेत्राला कशा प्रकारे गती देता येईल, याबाबत चर्चा केली. याचवेळी लांजा कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या निवेदन स्वरूपात स्वीकारून, बँकेचे चेअरमन तसेच राज्य सरकारशी बोलून त्यावर मार्ग काढू हा विश्वास संचालक, अधिकारी व कर्मचारी वर्गाला किरण सामंत यांनी दिला. यावेळी बँकेचे संचालक महेश खामकर, शिवसेना लांजा तालुकाप्रमुख गुरूप्रसाद देसाई, तसेच विकास सोसायटीचे अध्यक्ष, सचिव पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 17/Dec/2024

Hotel waiter