मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : रत्नागिरी जिल्ह्यातील ‘लाडके भाऊ’ तीन महिन्यांपासून मानधनापासून वंचित

रत्नागिरी : लाडक्या बहिणींना आगाऊ रक्कम देणाऱ्या शासनाने लाडक्या भाऊना मात्र तीन महिन्यांपासून मानधनापासून वंचित ठेवले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार युवकांची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत नेमणूक करण्यात आलेली आहे. सुरुवातीचे एक महिना मानधन दिल्यावर पुढील तीन महिने मानधन देण्यात आलेले नाही. यामुळे मानधन न मिळाल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यात सप्टेंबरपासून युवकांची नियुक्ती करण्यात येत आहे.

निवडणुकीपूर्वी या अंतर्गत २ हजार युवकांना विविध शासकीय, निमशासकीय, खासगी अस्थापना, कारखान्यामध्ये नेमणुका देण्यात आल्या आहेत. यामध्ये पदवीधरांना दहा हजार तर बारावी उत्तीर्ण युवकांना सात हजार रुपये मानधन दिले जाते. प्रशिक्षणार्थी युवक जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपालिका, पाटबंधारे, एसटी, आरोग्य विभाग, समाजकल्याण यांसह विविध विभागात काम करीत आहेत. लाडकी बहीण योजनेनंतर तरुणांमध्ये नाराजी पसरल्याने मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू केली. युवक रुजू झाल्यानंतर पहिल्या महिन्याचे वेतन देण्यात आले; मात्र त्यानंतर दोन ते तीन महिन्याचे मानधन जमा करण्यात आले नसल्यामुळे युवकांमध्ये नाराजी पसरली आहे.

एकीकडे लाडक्या बहिणींना काम न करता मानधन आणि दुसरीकडे युवकांना काम करूनदेखील मोबदला नाही. यामुळे नाराजी पसरली आहे. घरच्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांना रोजचे कामे करावे लागत आहे.

Radhakrushna patapedhi

हजेरी पाठवण्याचे काम पूर्ण
सांगलीतील कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभागाकडून युवकांची हजेरी वेळोवेळी पाठवण्यात आली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही काळ बेतनाचे काम थांबले आहे. आता येत्या चार दिवसांत युवकांचे वेतन रीतसर जमा होईल, असे सांगण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 18/Dec/2024