ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

◼️ श्री. दिपक पवार व सौ. पूजा पवार आणि ‘इन्फिगो’च्या सौजन्याने शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : समाज सेवेसाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या सौ.पुजाताई पवार, भावी नगरसेविका (शहर संघटक ) आणि दिपक पवार (विभाग प्रमुख) यांच्या आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या सौजन्याने याही वर्षी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २२ डिसें. ते २६ डिसें. पर्यंत मोफत नेत्र तपासणी आणि १० लोकांचे मोतीबिंदूचे मोफत शस्त्रक्रिया इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप येथे आयोजित करण्यात आले आहे.

तरी रत्नागिरी शहरातील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:55 19-12-2024

Shanti 3