चिपळुणात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ

चिपळूण : जिल्हा परिषद रत्नागिरी पंचायत समिती चिपळूण व सह्याद्री शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला. या विज्ञान प्रदर्शनात गुणानुक्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व पुष्प देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. यावेळी सावर्डे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, चिपळूण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राज अहमद देसाई, सशाली मोहिते, आसमा देसाई पटेल, असुर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक अमर भाट आदी उपस्थित होते.

विविध गटात सहभागी झालेल्या व गुणानुक्रमांक प्राप्त केलेल्या विद्याथ्यांची व शाळांची नावे गटानुसार पुढीलप्रमाणे – वैज्ञानिक प्रतिकृती प्राथमिक इ. सहावी ते आठवी गट – प्रथम ओम तेटांबे, विपुल सुर्वे सावर्डे हायस्कूल, विराट द्वितीय जिनगरे असुर्डे हायस्कूल, तृतीय आलीशा सय्यद, शहिफा सय्यद उर्दू हायस्कूल पोफळी, उत्तेजनार्थ प्रथम शर्वरी महादेव वेदिका घाणेकर जिल्हा परिषद शाळा कोंढमळा क्र. १, उत्तेजनार्थ द्वितीय विनया खेडेकर जोहा काझी कोकरे हायस्कूल, वैज्ञानिक प्रतिकृती माध्यमिक इयत्ता नववी ते बारावी गट – प्रथम इब्राहिम करजीकर, सैफ चौगुले नॅशनल हायस्कूल मिरजोळी, द्वितीय आदित्य कदम, समर्थ साळवी सुमन हायस्कूल टेरव, तृतीय मनीष जड्यार, सुहानी बारगोडे खांडोत्री हायस्कूल. शिक्षक साहित्य प्रतिकृती प्राथमिक पहिली ते आठवी गट- प्रथम अनिरुद्ध शिंदे भागशाळा कळंबस्ते, द्वितीय सुधीर उकार्डे जि. प. शाळा कॅरेटोक, तृतीय नथुराम आंबवकर जि. प. शाळा रावतळे. दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती प्राथमिक सहावी ते आठवी गट- प्रथम राधिका चव्हाण परांजपे मोतीवाले हायस्कूल, रिया शिंदे, आर्या सुर्वे न्यू इंग्लिश स्कूल खेडर्डी, सती चिंचघरी, तृतीय आदर्श मोहिते असुर्डे हायस्कूल. दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती माध्यमिक नववी ते बारावी गट – प्रथम सानिका तांदळे सावर्डे हायस्कूल, द्वितीय कस्तुरी मोडक, जान्हवी सुतार खेडर्डी, सती हायस्कूल, तृतीय तनवी गुडेकर, श्रेया कदम दलवाई हायस्कूल मिरजोळी, प्रश्नमंजुषा माध्यमिक नववी ते बारावी गट – प्रथम दक्ष गिजये, मनस्वी सुर्वे खेर्डी, चिंचघरी सती हायस्कूल, द्वितीय शौर्य टाकसाळे, श्रेया राडे सावर्डे हायस्कूल, तृतीय अन्वी खोत, ईशाली चितळे एस पी एम इंग्लिश मीडिअम स्कूल परशुराम. प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर गट प्रथम महेश राऊत इंग्लिश मीडिअम स्कूल भागशाळा कळंबस्ते, द्वितीय संतोष मेखी सावर्डे हायस्कूल, तृतीय सोनाली कोतकर नॅशनल इंग्लिश मीडिअम स्कूल मिरजोळी.

या प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून श्रीकांत कदम, गणेश कुलकर्णी, सौदागर एफ वाय, पराग कदम, मुन्नावद शेख, किरण शिवणकर यांनी काम पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:55 PM 19/Dec/2024

Ratnagiri Khabardar add image