रत्नागिरी : रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात पौराणिक, ब्रह्मसत्य, गण आणि भन्नाट विनोदी गौळणींनी नटलेले चौरंगी नमन येत्या शनिवारी (दि. २१ डिसेंबर) सादर करण्यात येणार आहे.
यात १४ ते ७५ वर्षांपर्यंतच्या महिलांचा सहभाग आहे.
जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार संस्था संचालित माऊली महिला नमन मंडळाने महिलांना व्यासपीठ दिले आहे. या मंडळातर्फे फक्त महिला कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नमन सादर केले आहे. या नमनाचे दिग्दर्शन नमनसम्राट यशवंत वाकडे यांचे असून निर्माता साईनाथ नागवेकर आहेत. नेपथ्याची बाजू संतोष ऊर्फ बावा आग्रे सांभाळणार असून, सूत्रधार सागर मायंगडे, वासुदेव वाघे आहेत. नमनाला बुलबुलतरंग परशुराम घवाळी, ऑक्टोपॅडसाथ मांडवकर, की बोर्डसाथ प्रवीण सावंतदेसाई, ढोलकीसाथ आंबेरकर करणार आहेत. गीतलेखन सौ. सर्वदा चव्हाण यांनी केले आहे. तर, गायिका आकांक्षा वायंगणकर आहेत. यासाठी दादा वाडेकर, शरद गोळपकर, राकेश बेर्डे, संजय मेस्त्री, मदन डोर्लेकर, मानसी साळवी यांचे विशेष सहाय्य लाभले आहे.
या नमनात प्रेरणा विलणकर, वेदा शेट्ये, पूनम गोळपकर, शीतल सकपाळ, रेश्मा शिंदे, माधवी पाटील, समीक्षा वालम, विनया काळप, अर्चना मयेकर, तन्वी नागवेकर, गीता भागवत, रेखा खातू, पूर्वा चव्हाण, जुही पावसकर, शोभना वडपकर, समीक्षा विलणकर या कलाकारांनी सहभाग घेतला आहे.
मंडळाला आभार संस्था संचालित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळाने सहाय्य केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 20-12-2024














