रत्नागिरी : ज्ञान मंदिराच्या जीर्णोद्धाराला मदत

रत्नागिरी : शंभर वर्ष ज्ञानदानाचे कार्य करणारी धोपेश्वर शाळा नंबर एक या शाळेच्या जीर्ण वास्तूचे दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे व त्या साठी शालेय माजी विद्यार्थी, गावकरी तसेच शाळा दुरुस्ती साठी श्री.माधव काका करंबेळकर, डॉ. प्रसाद गुरव शाळा दुरुस्ती कमिटी, शाळा प्रेमी या साठी निधी संकलनाचे काम करीत आहेत. राज्याचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कडे या संदर्भात त्यांचे स्वीय सहाय्यक श्री.अनिकेत पटवर्धन यांना या शाळेबाबत भा.ज.पा कार्यकर्ते खंणकर आणि भाजपा प्रदेश महिला मोर्चा सचिव सौ शिल्पा मराठे यांनी दुरुस्ती संदर्भात माहिती दिली.

श्री. चव्हाण यांनी तात्काळ रक्कम रु. एक लाख मदत जाहीर करत सोमवारी सौ शिल्पा मराठे यांच्या मार्फत ही आर्थिक मदत शाळेत जाऊन दुरुस्ती कमिटीचे उपाध्यक्ष श्री. सुहास करंबेळकर यांच्या कडे मदत सुपूर्द करण्यात आली. शाळा मुख्याध्यापक सौ. प्रियांका गुंडये मॅडम, सौ.मयेकर मॅडम, श्री.चौगुले सर या वेळी उपस्थित होते.

शाळा दुरुस्ती कमिटी आणि शाळेच्या मुख्याध्यापक यांनी या प्रसंगी श्री. चव्हाण यांना आणि अनिकेत यांना या बाबत धन्यवाद दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 24-12-2024

Infigo Eyecare