तवसाळ तांबडवाडी येथे पडवे केंद्राचे हिवाळी क्रिडा स्पर्धा जल्लोषात संपन्न

रत्नागिरी : दिनांक -२०/२१ डिसेंबर २०२४ रोजी पडवे केंद्राच्या क्रिडा स्पर्धा तवसाळ तांबडवाडी क्रिडा नगरीत उत्साहात पार पडल्या या स्पर्धेचे यजमानपद ६ वर्षा नंतर आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडीला लाभले याचे उत्तम नियोजन करण्यासाठी ग्रामस्थ, महिला मंडळ माजी विद्यार्थी व मुंबई मंडळ यांच्या सहकार्याने दोन दिवसशीय स्पर्धेचे आयोजनात पुढाकार घेतला तर मुंबई मंडळाच्या वतीने तांबडवाडी ग्रामस्थ, महिला मंडळ यांच्या नावाचा चषक व मिडल्स आणि आर्थिक साहाय्य करत आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे शिक्षण वृंद विद्यार्थी वर्ग आणि क्रिडा रशिक अंदाजे ४००/४५० जेवणाची व्यवस्था करण्यासाठी करण्यात आली.वेळेत जेवण बनवर्या महिला अभिनंदन.तर शाळेय शिक्षण पालक कमिटी व ग्रामस्थ महिला मंडळ यानी उत्तम नियोजन करण्यात आले तर केंद्रीय एकुण १२ शाळा सहभागी झाल्या होत्या सर्व शिक्षकांच्या वतीने ग्रामस्थ महिला मंडळ आणि मुंबई मंडळाचे विषेश अभिनंदन केले. तर तांबडवाडी चॅम्पियन चषकाचे मानकरी ठरले कुंडली नंबर १ शाळेचे अभिनंदन. आणि काताळे शाळा नंबर १ बक्षीस मिळविले. आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी- बाबरवाडी मुलांनी एकसंघ यावेळी ७ बक्षिसं मिळाली व वयक्तित मेडल्स मिळवत उत्तम कामगिरी केली.

केंद्रीय क्रीडा स्पर्धा उपस्थित मान्यवर पडवे ऊर्दू केंद्राचे अध्यक्ष श्री परवेज चिपळूणकर साहेब, काताळे- तवसाळ निर्मल ग्राम पंचायत सरपंच सौ. प्रियंका सुर्वे मॅडम, माजी सरपंच सौ नम्रता निवाते, शिक्षण प्रेमी श्री विजयजी मोहिते साहेब, भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष श्री निलेशजी सुर्वे साहेब, श्री विजय नाचरे साहेब, आदर्श शाळा कमेटी अध्यक्ष श्री रमेश कुरटे, उपाध्यक्ष सौ. वैष्णवी निवाते आणि सर्व सदस्य,काताळे गावचे सदस्य तवसाळ तांबडवाडी मधील वरिष्ठ ग्रामस्थ महिला मंडळ माजी विद्यार्थी, आणि सर्व शाळांमधील शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

क्रिडा स्पर्धा नियोजसाठी उत्तम कामगिरी
चंद्रकांत निवाते,मोहन घाणेकर,बारकु निवाते, रमेश कुरटे, कृष्णा वाघे,मंगेश पारदळे, दिनेश कुरटे,शिवराय घाणेकर, महादेव कुरटे,चंदू पवार, दिपक पारदळे, सोन्या कुरटे, शंकर वाघे, काशिनाथ कुळये, सखाराम वाघे,बबन कुरटे, आणि सर्व महिला मंडळ यांनी योगदान दिले.तर मुंबई वरुन स्पर्धेसाठी उपस्थित Dj सचिन कुळये यांची प्रमुख उपस्थिती होती. संपुर्ण क्रिडा स्पर्धेचे फोटो, व्हिडिओ, फेसबुक live करुन YouTube वरती उपलब्ध आहेत. तरी पडवे क्रेंद्राच्या वतीने तवसाळ तांबडवाडी व आदर्श शाळचे आयोजनासाठी सर्वांचे आभार मानले व मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:49 28-12-2024