खेड : आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंतर्गत २०२४-२५ मध्ये खेड तालुक्यातील महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. जिल्हा कार्यालय रत्नागिरी सबएजंट संस्था म्हणून खेड तालुका सहकारी खरेदी – विक्री संघ लि. खेड यांच्यामार्फत शनिवार, दि. २८ रोजी वेरळ गोडावून येथे भात खरेदी केंद्राचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष बाबाजी जाधव व संचालक मंडळ तसेच व्यवस्थापक सचिन कुळे तसेच शेतकरी वर्ग व कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पडले. चालू वर्षी सर्वसाधारण भाताचा दर २,३०० रुपये क्विंटल निश्चित झालेला असुन भाताची रक्कम मार्केटिंग फेडरेशनमार्फत बँक खात्यावर जमा होणार आहे. भात खरेदी साठी शेतकर्यांनी खरीप भात पिक पेरा नोंद सन २०२४-२५ चा ७/१२ उतारा, बँक पासबूक, आधार कार्ड झेरॉक्स आवश्यक आहे. तरी तालुक्यातील शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे संघाचे अध्यक्ष बाबाजी जाधव यांनी आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 30/Dec/2024














