देवरूख-पुणे गाडीतील सततच्या बिघाडाने प्रवासी त्रस्त

देवरुख : शहरातील आगाराची देवरुख-पुणे (पिंपरी चिंचवड) ही स्लीपर सिटर बस सातत्याने या ना त्या कारणाने पुणे मार्गावर येता जाता सतत बंद पडत असल्याने देवरुख-पुणे व पुणे-देवरूख मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

आगारातून पुणे-पिंपरी- चिंचवडसाठी सकाळी ८ वाजता ही स्लीपर सिटर बस सुटते. मात्र सध्या एक ते दीड वर्ष झाले या बसमध्ये या ना त्या कारणाने सातत्याने बिघाड होत आहे. मध्यंतरी या बसविषयी खुद्द देवरुख आगारातील या बसवर ड्युटी करणाऱ्या एका चालकानेच आवाज उठविला होता. परंतु, एसटीची प्रतिमा मलिन केली, असा ठपका ठेवून त्या चालकाची इतरत्र बदली केली. तरीदेखील या बसमध्ये बिघाड होण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. या प्रकरणी वरिष्ठ कार्यालयाने लक्ष घालून तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 30/Dec/2024

Ratnagiri Khabardar add image