◼️ जयंत पाटील यांनी केलं दिवंगत कुमार शेट्ये यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुहास वामन उर्फ कुमार शेट्ये याचं चार दिवसांपूर्वी निधन झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी रत्नागिरीतील शिरगाव येथे दिवंगत कुमार शेट्ये यांच्या घरी भेट त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं.
तसेच कुमार शेट्ये यांच्या आठवणींना उजाळा दिला. कुमार शेट्ये यांच्या सारखा निष्ठावंत, प्रामाणिक, आणि पवार साहेब यांच्यावर निष्ठा असणारा एक मोठा नेता आमच्या पक्षाने गमावला आहे, त्यांची पोकळी आम्हाला कायम जाणवेल आशा भावना जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरद पवार यांनी कुमार शेट्ये यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत शेट्ये यांचे चिरंजीव सूरज शेट्ये यांना तत्काळ पत्र पाठवून श्रद्धांजली वाहिली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 31-12-2024













