चिपळूण : खेर्डी सरपंचपदी सुगंधा माळी यांची बिनविरोध निवड

चिपळूण : तालुक्यात लोकसंख्येने जास्त आणि सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या खेर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुगंधा माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन सरपंच अश्विनी पंडीत यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. महसूलचे नायब तहसीलदार वाल्मिक मोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

खेर्डी ग्रामपंचायतीवर सुकाई परिवर्तन पॅनेलची एकहाती सत्ता आहे. गेल्या तीन चार वर्षाच्या कालावधीत पॅनेलच्या तीन ग्रामपंचायत सदस्या महिलांना सरपंचपदाची संधी मिळाली. प्रभारी सरपंच म्हणून सचिन मोहिते यांनी काम पाहिले होते. सोमवारी खेर्डी ग्रामपंचायतीत सरपंच निवडीचे आयोजन करण्यात आले होते. सरपंचपदासाठी सुगंधा माळी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खेर्डी ग्रामपंचायतीत सरपंच पद महिलांसाठी आरक्षीत आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षाच्या कालावधीत वृंदा दाते, अपर्णा दाते व अश्विनी पंडीत यांनी सरपंचपदाची संधी मिळाली. आता सरपंचपदी सुगंधा माळी यांची वर्णी लागली आहे. पॅनेलचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत गावात विविध विधायक उपक्रम राबविण्याचा मानस नवनिर्वाचीत सरपंचानी व्यक्त केला. सरपंच निवडीवेळी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, सदस्य सचिन मोहिते, विनोद भुरण, अभिजीत खताते, अपर्णा दाते, सुप्रिया उतेकर, वृंदा दाते, आश्वीनी पंडीत, प्रकाश पाथरूड, विजय शिर्के वैशाली मोरे यांच्यासह अजित खताते, शशिकांत कासार, दिप्ती सावंत देसाई, प्रकाश खताते, शांताराम भुरण, सतीश शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी संदीप कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 31/Dec/2024