रत्नागिरी : जिल्ह्यात 10 ठिकाणी नाकाबंदी

रत्नागिरी : सरत्या वर्षाला निरोप देण्यास आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत दाखल झाले आहेत. नववर्षाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. 

त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 10 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. 350 होमगार्ड, किनार्‍यावर गाड्या जाऊ नयेत, यासाठी बॅरेकेडिंग, किनार्‍यावर सागरी सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून धोक्याबाबत अनाऊसिंग करण्यात येत आहे. हर्णे, मुरूड, गणपतीपुळे, आरेवारे येथे वाहतूक पोलिस तैनात, गोवा बनावटीची दारू तपासणी मोहीम जोरात असून पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सहा ठिकाणी ब्रीथ अ‍ॅनालायझरद्वारे मद्यप्राशन केलेल्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे.

समुद्रकिनार्‍यांवर विशेष लक्ष

रत्नागिरीतील गणपतीपुळे आणि आरेवारे समुद्रकिनार्‍यावर विशेेष लक्ष पोलिस यंत्रणेने दिले आहे. आरेवारे येथे रुग्णवाहिका तैनात करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. तसेच गणपतीपुळे-रत्नागिरी मार्गावर शिरगाव मोहल्ला येथे वाहतूक कोंडी लक्षात घेऊन दोन बाजूने पोलिस व होमगार्ड बंदोबस्ताला ठेवण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 31-12-2024

Arihant 2