केरळ येथील वृद्धाचा रत्नागिरीत मृत्यू

रत्नागिरी : तापाने व मानसिक स्वास्थाने आजारी असलेला वृद्ध रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वेस्टेशन येथे आढळला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, जयराज गोपाळकृष्ण पिव्ही (वय ७३, रा. केरळ पूर्ण पत्ता माहिती नाही) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ३०) दुपारी पावणेबाराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयराज पिव्ही हे रत्नागिरी रेल्वेस्टेशनला तापाने व मानसिक स्वास्थाने आजारी असलेल्या स्थितीत रेल्वे कर्मचाऱ्यांना दिसले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 31/Dec/2024