देवरूख : शहरातील मच्छीमार्केट येथे ट्रकची धडक बसून वनिता तुकाराम झोरे यांचा बुधवारी अपघात झाला. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. या सर्व घटनेत येथील मनसेच्या कार्यकर्ते झोरे कुटुंबीयांच्या मदतीला धावून जात आर्थिक सहकार्य करुन माणुसकीचे दर्शन घडवले.
या अपघातात झोरे यांच्या पायांवरून ट्रक गेला. पाय निकामी झाला. यातच उपचारादरम्यान वनिता यांचा मृत्यू झाला. यात झोरे कुटुंब आर्थिक अडचणीत आले. ही बाब मनसेच्या कार्यकर्ते यांना समजली. त्यांनी प्राथमिक आर्थिक मदत देवू केली. या नंतर अपघात करणारे यांचा शोध घेतला. यात अपघातातील वाहन हे गोवा येथील असल्याचे समजले. मनसे कार्यकर्ते यांनी या गाडी मालकाचा शोध घेतला अन मनसे स्टाईल मालकाला दाखवली. या नंतर या गाडी मालकाने झोरे यांना आर्थिक मदत दिली. यामुळे झोरे कुटुंबावरील आर्थिक संकट दूर झाले.

अपघात घडल्यापासून झोरे कुटुंबाच्या मदतीसाठी मनसे धाऊन गेली. अपघातग्रस्त कुटुंबाला तत्काळ मदत मिळवून दिली. यामुळे झोरे कुटुंबांनी राज ठाकरे व मनसे पदाधिकारी यांचे आभार मानले.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, मनसे शहराध्यक्ष सागर संसारे, मनविसे शहराध्यक्ष ऋतुराज देवरुखकर, मनसे विभाग अक्षय झेपले, सचिव तुषार बांडागळे, शाखाध्यक्ष ओंकार विंचू महाराष्ट्र सैनिक दीपक शिंदे आदी मदतीसाठी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 01/Jan/2025













