रत्नागिरी : गावखडी समुद्रकिनारी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी सुरुच्या बनात मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १०.१५ वा. कालावधीत करण्यात आली.

नवीद नासीर दर्वेश (२४), अब्दुल बासित भट्टीवाले (२३, दोन्ही रा. गावखडी मुस्लिम मोहल्ला, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.

हे दोघेही आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी दारु पित असताना ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 03/Jan/2025