कोकण रेल्वेमार्गावर पुणे-करमाळी गाडी ८ जानेवारीपर्यंत धावणार

रत्नागिरी : नववर्षाच्या स्वागतासाठी पार्श्‍वभूमीवर पुणे येथून गोव्याला जाणार्‍या प्रवाशांसाठी पुणे-करमाळी साप्ताहिक विशेष गाडीच्या ६ फेर्‍या चालवण्यात आल्या. ८ जानेवारी रोजी स्पेशलची अखेरची फेरी धावणार आहे. ०१४०७/०१४०८ क्रमांकाची पुणे-करमाळी साप्ताहिक पुणे येथून पहाटे ५.१० वा. सुटून त्याच दिवशी रात्री १०.३५ वा. करमाळी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात करमाळी येथून रात्री १०.२० वा. सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी १ वाजता पुणे येथे पोहचेल.

या स्पेशलला चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम स्थानकात थांबे आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:04 PM 03/Jan/2025