चिपळूण येथील रंगकर्मी प्रसाद (भाऊ) कार्ले यांना राष्ट्रीय एकात्मता, दीपस्तंभ पुरस्कार

चिपळूण : भावना बहुउद्देशीय संस्था, पंचवटी यांचा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार आणि जिव्हाळा सामाजिक संस्था, नाशिक यांचा दीपस्तंभ पुरस्कार चिपळूण येथील जेष्ठ रंगकर्मी यांना प्राप्त झाला आहे. हा सोहळा नाशिक येथे पार पडला.

चिपळूण मधील हौशी रंगभूमीवर १९८४ पासून योगदान दिल्याबद्दल व नाट्य क्षेत्रामध्ये सुमारे तीनशे पारितोषिके व विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील ११ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद उर्फ भाऊ कार्ले यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. रांगभुमीसाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असेच आहे. याची दखल घेत त्यांना २०२४ व २०२५ साठी जाहीर झालेले राष्ट्रीय एकात्मता व दीपस्तंभ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. या दोन पुरस्कारांचे दिनांक पाच जानेवारी रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.

या त्यांच्या दोन पुरस्कारंबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक व शुभेच्छा चा वर्षाव होत आहेत. भाऊ गेली चाळीस वर्षे एकांकिका, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नाट्य शिबीरे आणि विविध स्पर्धाचे सातत्याने आयोजन करत रंगभूमी जिवंत ठेवण्याचे कार्य निस्वार्थी पणे करत आहेत. सर्वांनीच त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 07/Jan/2025

Ratnagiri Khabardar add image