चिपळूण : एसी/एसटी प्रवर्गातील तरूणांसाठी प्रशिक्षण

चिपळूण : द नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड, नॅशनल एसी/एसटी हब सिंधुदुर्ग यांच्यावतीने एसी/एसटी प्रवर्गातील तरुण-तरुणींसाठी दि. ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत शहरातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात शासकीय टेंडर प्रक्रिया कशी असते, टेंडर कसे भरावे, आपल्या प्रवर्गासाठी काय सवलती आहेत, याबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच केव्हीआयसीतर्फे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाचे कोणते व्यवसाय करता येऊ शकतात, त्यासाठी काय प्रक्रिया असते, याबाबत माहिती दिली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 09/Jan/2025