मुंबईत होणाऱ्या कामगार कबड्डी स्पर्धेत प्रवेशिका मिळवण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारीपर्यंत

चिपळूण : औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची २८ वी आणि महिलांची २३ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन चिपळूणचे कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड यांनी केले आहे. मुंबईतील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे ही स्पर्धा होईल. पुरुष शहरी, ग्रामीण आणि महिला (खुला) अशा तीन गटात सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी असून, प्रवेशिका व नियमावली मंडळाच्या www. public.mlwb.in या संकेतस्थळांवर आणि मंडळाच्या राज्यातील सर्व विभाग व गट कार्यालयांत तसेच कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 10/Jan/2025

Cake of the day