रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे ४८ वे वार्षिक अधिवेशन ज्ञानरश्मी वाचनालय, मु. पो. तालुका गुहागर, जि. रत्नागिरी येथे संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण गजानन साबणे यांच्या अध्यक्षतेखाली दि. १८ व दि. १९ जानेवारी रोजी होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन जगन्नाथ कोठेवार यांच्या हस्ते होणार आहे. अधिवेशनाच्या प्रमुख उपस्थितीत प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांतजी पाटील, कोकण विभाग ग्रंथालय संघ अध्यक्ष दिलीप कोरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक, निरीक्षक, हेमंत काळोखे, ज्येष्ठ उद्योजक श्रीराम खरे उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनाच्या यजमान पदाची जबाबदारी ज्ञानरश्मी वाचनालय, मु. पो. ता. गुहागर, जि. रत्नागिरी यांनी पेलली असून अधिवेशनाची जय्यत तयारी करीत आहेत.
अधिवेशनाचे दि. १८ जानेवारी रोजी उद्घाटन झाल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर १९ जानेवारी रोजी प्रारंभी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर परिसंवाद मराठी भाषेला अभिजात दर्जा आणि ग्रंथालय हा कार्यक्रम होणार आहे. तसेच श्रद्धा वाजे यांचे कथा अभिवाचन होणार आहे. तदनंतर संघाचे खुले अधिवेशन व सर्व साधारण सभा राज्य ग्रंथालय संघ अध्यक्ष गजानन जगन्नाथ कोठेवार अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण सावणे, संभाजी सावंत, कांत पाटील, महेंद्र दळवी, राकेश आंबेरकर, गजानन जोशी, रविंद्र कालेकर, मुरलीधर बोरसुतकर, विश्वनाथ बापट, विजय कालेकर, राजेंद्र आरेकर, श्री. दत्तात्रय गुरव, सौ. मनाली बावधनकर, ज्ञानेश्वर झगडे इत्यादी पदाधिकारी पराकष्ट घेत आहेत. या अधिवेशनाला जिल्ह्यातील १४८ ग्रंथालयाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 11/Jan/2025














