रत्नागिरी श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा २१ सप्टेंबरला मासिक स्नेहमेळावा

त्नागिरी : येथील श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा मासिक स्नेहमेळावा शनिवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्रीराम मंदिरात होणार आहे.

कोकणातील प्रसिद्ध विनोदी कलाकार संदीप पावस्कर यांचा यावेळी ग्रामीण भाषेतील हास्यविनोद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ज्येष्ठांची धमाल करमणूक करणाऱ्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कलाकाराला दाद द्यावी, असे आवाहन कट्ट्याचे मुख्य संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये आणि सचिव समाजभूषण सुरेंद्र घुडे यांनी केले आहे.

मेळाव्यात सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 17-09-2024

Mahrashi karve ANM