रत्नागिरी : शहराजवळील चर्मालय येथे रस्त्याच्या डाव्याबाजूस असलेल्या बंद पत्र्याच्या टपरीमागे गावठी हातभट्टीची १९ लिटर दारु विक्रीसाठी आपल्याजवळ बाळगणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५.२५ वा. सुमारास करण्यात आली.
विकास सुरेश सनगरे (४३, रा. मिरजोळे नाखरेकरवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार बाळू पालकर यांनी तक्रार दिली आहे. संशयित हा गावठी दारु विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार, साळवी स्टॉप ते चर्मालय जाणारा रस्त्यावर ते गस्त करत असताना संशयित हा तेथील बंद पत्र्याच्या टपरीमागे २ हजार १०० रुपयांची १९ लिटर गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 23/Jan/2025














