एसटीच्या भाडेवाढीवर आज निर्णय

मुंबई : राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेवाढीबाबत गुरुवारी निर्णय होणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या होणार असलेल्या बैठकीमध्ये आहे.

एसटी महामंडळाने २ ते ३ कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा कमी करण्यासाठी स्वयंचलित भाडे सुधारणा सूत्राअंतर्गत भाडेवाढीची मागणी केली होती.

गेल्यावर्षी हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार १४ ते १५ टक्के भाडेवाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार टप्पा वाहतूक सेवांच्या भाड्यांमध्ये आपोआप भाडेवाढीच्या सूत्रानुसार प्रतिटप्पा दरवाढ व ठोक भाडे पद्धतीने प्रवासभाडे आकारणीसाठी परवानगी मिळण्यावर निर्णय होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 23-01-2025

Kokan camp