दापोली : दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांची यवतमाळ जिल्ह्यात भूसंपादन, रस्ते प्रकल्प या पदावर उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
जयराम देशपांडे यांनी दापोलीत उपविभगीय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर पनवेल मेट्रो येथे देखील काम पाहिले. त्या नंतर त्यांची निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून गोंदिया जिल्ह्यात बदली झाली. या नंतर ते रायगड येथे पुनर्वसन उपजिल्हाधिकारी असताना त्यांच्यावर दापोली मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने कारवाई केली होती.
जयराम देशपांडे हे दापोलीचे उपविभागीय अधिकारी होते. त्यांच्या कार्यकाळातच साई रिसॉर्टच्या बांधकामाला परवानगी मिळाली होती. भाजपचे माजी खासदार आणि भाजप नेते किरिट सोमय्या यांनी साई रिसॉर्टबाबत वारंवार उठविलेल्या आवाजानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 03/Feb/2025













