चिपळूण : डीबीजे महाविद्यालयात मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया सुरू

चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र चालविले जाते. सदर केंद्र १९९२ पासून सुरू आहे. या केंद्रात बी. ए., बी. कॉम., बी. लिब., योग शिक्षक, रूग्ण सहाय्यक इत्यादी अभ्यासक्रम सुरू आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांकरिता फक्त प्रथम वर्ष बी.ए., प्रथम वर्ष बी.कॉम. या अभ्यासक्रमासाठीच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या वर्षांपासून जानेवारी हे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केले आहे. त्यामुळे ज्यांना जूनमध्ये प्रवेश घेता आलेला नाही, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे. रुग्ण सहाय्यक हा कोर्स दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध आहे. लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी केंद्राशी प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी केंद्र सहाय्यक प्राजक्ता गोखले यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ. माधव बापट, केंद्र संयोजक प्रा. विनायक बांद्रे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 04/Feb/2025

Arihant 1