महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन : निसर्गचित्रकार विष्णू परीट यांचा राज्य पुरस्काराने गौरव

संगमेश्वर : कोकणच्या संगमेश्वर तालुक्यातील प्रथितयश जलरंग निसर्गचित्रकार विष्णू परीट यांना काल मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे ६४ व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांच्या हस्ते राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र आणि ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

१० फेब्रुवारीपर्यंत ते प्रदर्शन खुले राहणार आहे. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या सर्व कलाकृतीची राज्यपाल यांनी पाहणी करून कलाकारांच्या कलाविष्काराचे कौतुक केले. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर सचिव बो. वेणूगोपाल रेड्डी, अभिमत विद्यापीठ कुलगुरू रजनीश कामत, कलासंचालक संतोष क्षीरसागर, निरीक्षक संदीप डोंगर आदी उपस्थित होते.

कला संचालनालयातर्फे तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना चित्रकार वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार आणि चित्रकार शकुंतला कुलकर्णी यांना कला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चित्रकार शकुंतला अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्या भगिनी चित्रा पालेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारता, एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारचे स्वरूप आहे. राज्यातून ७८० कलाकृती आल्या होत्या. यातील १४८ कलाकृतीची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आलो. यातील १५ चित्रकारांच्या कलाकृतीना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यासवेजो पद्मश्री पुरस्काराम सुलेखनकार अच्युत पालय यांना पद्यश्री मिळालावत राज्यपालांच्या हस्ते त्यांना मानित करण्यात आले.

संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे या गावातील विष्णू फीट है माध्यमिक विद्यामंदिर सोनवडे येथे कलाशिक्षक म्हणून निवृत्त झाले. परीट गेली ३५ वर्षे जलरंगामध्ये कोकणच्या निसर्गाची विविध रूपं आपल्या जादुई कुंचल्यातून साकारत आहेत. त्यांनी आजवर जलरंगात शेकडो चित्रे रेखाटली आहेत. राज्याच्या विविध भागात त्यांची कलादर्शन भरली आहेत. याचबरोबर जलरंगात त्यांनी शेकडों प्रात्यक्षिके दाखवली आहेत.

Shanti 4

गेली ३५ वर्षे आपण निसर्गचित्र रेखाटत आहोत. कलेची सेवा आपल्या हातून होत असताना मनाला होणारा आनंद हा आपण प्रत्येकवेळी आपल्या कलाकृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रसिकांनी आपल्या कलाकृतींवर आजवर जे प्रेम केले त्यामुळेच आज राज्यशासनाच्या कला संचालनालयाचा मानाचा पुरस्कार महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांच्या हस्ते आपल्या कलाकृतीला मिळू शकला. हा पुरस्कार माझ्या जीवनातील अत्यंत आनंददायी क्षण आहे. या पुरस्काराने आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे. – विष्णू परीट

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 05/Feb/2025