माहेर संस्थेतर्फे २४ जणांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : हातखंबा येथील माहेर संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त समाजोपयोगी कार्य करणाऱ्या रत्नागिरीतील २४ सामाजिक कार्यकर्त्यांचा माहेर समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संस्थापिका संचालिका सिस्टर लुसी कुरियन यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन करण्यात आला.

संस्थेतील बालकांनी स्वागतगीत व नृत्याविष्काराने सर्वांचे स्वागत केले. महिलांनी व पुरुषांनी नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. पुरस्कार मिळालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा पुरस्कार मिळाल्याने सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचे सांगितले. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, अॅड. महेंद्र मांडवकर, नंदा शेलार, भिकाजी गावडे, निवळी रावणंगवाडी पोलिस पाटील भालचंद्र शितप, खेडशी गावच्या पोलिसपाटील शलाका सावंतदेसाई, कारवांचीवाडी पोलिसपाटील स्वाती जाधव आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील कांबळे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 11/Feb/2025

Radhakrushna patapedhi