वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा : अनिरुद्ध कांबळे

लांजा : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर आता अभिनेता राहुल सोलापूरकरने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही चुकीचे एकेरी वक्तव्य केले आहे. त्याच्या या वक्तव्याने आंबेडकरी जनतेमधून संताप व्यक्त केला जात आहे. या सोलापूरकरवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष व भीमशक्ती कोकण प्रदेश अनिरुद्ध कांबळे यांनी केली आहे.

अभिनेता राहुल सोलापूरकरचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोलापूरकर हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचे एकेरी वक्तव्य करीत असल्याचे दिसून येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार मांडला. विषमतेचे प्रतीक असणाऱ्या ब्राह्मण्यवादातून बाबासाहेबांना ब्राह्मण ठरविण्याचा आटापिटा आहे. सोलापूरकरने केला त्याच्या वादग्रस्त विधानाने आंबेडकरी जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्याच्यावर अँट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तत्काळ अटक करावी, अशी मागणी अनिरुद्ध कांबळे यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 13/Feb/2025