साखरपा : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कबनुरकर सभागृह येथेराजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे जिल्हा परिषद गटातील विकासात्मक दृष्टीने अधिकार्यांना येणार्या अडचणी व भविष्यातील विकासकामाबाबत चर्चा केली.
साखरपा विभागात सुरु असणार्या व अपेक्षित असणार्या विविध विकासकामांची व समस्याचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेत त्यावर ताबडतोब उपाययोजना करणार असल्याचे सांगितले. यावेळी नायब तहसीलदार गोताड, पोलीस निरीक्षक अमित यादव, गटविकास अधिकारी भरत चौघुले, विलास चाळके, संदेश शेट्ये, राजेश पत्याने, सर्व विभागाचे अधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 03-03-2025














