चिपळूण : अनेक शतकांची परंपरा असलेला व सांस्कृतिक मूल्यांची जोड देणारा होळी हा उत्सव साजरा करताना पर्यावरणाला हानी पोहोचू नये या उद्देशाने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने गांधी तीर्थ राज्यस्तरीय प्रतियोगिता जळगाव या उपक्रमांतर्गत पर्यावरण पूरक होळी व रंगपंचमी साजरी करण्याचा व जनजागृती करून पर्यावरण संवर्धन करण्याचा निर्धार केला आहे या उपक्रमात विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग आहे.
होळी उत्सव साजरा करून आनंद द्विगुणीत करण्याबरोबरच परंपरा टिकवण्याचे काम करणे आवश्यक आहे मात्र त्याचवेळी पर्यावरणाला हानी पोहोचू नये म्हणून रासायनिक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंग वापरावेत, कडक उन्हाळ्यात पाण्याची टंचाई सर्वत्र जाणवत आहे म्हणून पाण्याचा कमीत कमी वापर करावा, प्लास्टिक हानिकारक असून प्लास्टिक फुग्यांचा वापर टाळा, पशुपक्ष्यांच्या अंगावर रंग न टाकने, मानव व प्राणी यांना त्वचांच्या विकारापासून वाचवणे, होळी साजरी केल्यानंतर कचऱ्यांचे विलगीकरण करणे या लहान लहान बाबी विद्यार्थ्यांनी घराघरात पोचवून पर्यावरण पूरक होळी व रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले. पर्यावरण पूरक होळीचा संदेश घराघरात पोहोचावा या उद्देशाने २२४६ संदेश पत्राचे वाटप करण्यात आले व पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचा संकल्प विद्यार्थ्यानी केला आहे. या उपक्रमा मुळे सावर्डे परिसरातील दहा हजार लोकांच्या पर्यंत पर्यावरण पूरक होळीचा संदेश पोहोचवला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत सावर्डे ग्रामपंचायत सरपंच सदस्य सावर्डे बाजारपेठेतील दुकानदार सावर्डे परिसरातील शिक्षणप्रेमी पालक व विद्यार्थ्यांना या संदेश पत्राचे वाटप करून पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक जयंत काकडे व अमृत कडगावे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाने राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, शालेय समितीचे चेअरमनव जेष्ठ विश्वस्त शांताराम खानविलकर, संस्थेचे पदाधिकारी, शालेय समितीचे सदस्य, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर व पालकांनी कौतुक केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 14/Mar/2025














