राजापूर : जैतापूर येथील आगरवाडीत रविवारी श्रीराम जन्मोत्सव

राजापूर : तालुक्यातील जैतापूर मधील आगरवाडी येथील श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिरात रविवार, दि. ६ एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवा कीर्तनकार यश सोवनी यांचे राम जन्माचे कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 03/Apr/2025