राजापूर : राजापूर शहरातील समर्थनगर (भटाळी) येथील रस्त्याच्या कामाची सोमवारी आमदार किरण सामंत यांनी पाहणी केली. शहरात अशाप्रकारे रस्त्यांचे रूंदीकरण होऊन शहरवासीयांना चांगली सेवा मिळणार असेल, तर यापुढेही अशा रस्त्यांच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही आमदार सामंत यांनी दिली.
आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याने शहरातील समर्थनगर (भटाळी) येथील रस्त्याच्या कामासाठी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी नगरोत्थान योजनेंतर्गत ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेंतर्गत या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा यात समावेश आहे.
याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, जिल्हा बँक संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर, राजापूर अर्बन बँकेचे संचालक संजय ओगले, अॅड. यशवंत कावतकर, प्रसन्न मालपेकर, माजी नगरसेवक गोविंद चव्हाण, दीलीप चव्हाण, स्थानिक नागरीक डॉ. अरूण जोशी, डॉ. सुयोग परांजपे, डॉ. अभय अळवणी, दिलीप गोखले, रमेश गुणे, संतोष पेडणेकर, नगर परिषदेचे कार्यालयिन अधिक्षक जितेंद्र जाधव, अभियंता रणविर कोकरे देसाई, योगेश बंडगर, ठेकेदार डी. एम. चव्हाण आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 09/Apr/2025














