रत्नागिरी : तालुक्यातील पुर्णगड येथे जय हनुमान ऐक्यवर्धक नाट्य मंडळ किल्लेकरवाडी पुर्णगड यांजकडून हनुमान जयंती उत्सवानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 12 एप्रिल 2025 रोजी स.6.00 वा. हनुमान जन्मोत्सव सोहळा, स.09.00वा.अभिषेक, स.10.30वा. श्री.सत्यनारायण महापुजा, दु12.30 ते 3.00वा. महाप्रसाद, दु. 2.00ते दु 4.00 वा. इन्फिगो हाॅस्पीटलतर्फे मोफत नेत्रतपासणी शिबीर, दु.3.00 वा.हळदीकुंकू समारंभ, सांय.6.00 वा.भजन , सांय. 7.00 वा.आरती ,रात्री 10.00 वा.रत्नलेखा, मुंबई निर्मित नाट्यकलाकृती
आता तरी हो म्हण …” अशा कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान ऐक्यवर्धक नाट्य मंडळ किल्लेकरवाडी पुर्णगड यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 11-04-2025














