चिपळूण : गोवळकोट येथे आज रक्तदान शिबिर

चिपळूण : सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चिपळूण शहरातील जय हिंद क्रीडा मंडळ, गोवळकोटतर्फे सोमवार दि. २८ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थान भक्तनिवास, गोवळकोट (चिपळूण) येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी व तरुणांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा व अधिक माहितीकरता मनोज कानापडे, अमर शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जय हिंद क्रीडा मंडळ, गोवळकोटतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 28/Apr/2025