मंडणगड : प्राथमिक शिक्षक रमेश बुंदे यांचे उपोषण अखेर मागे

मंडणगड : कामगार दिनाच्या निमित्ताने मंडणगड पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर सातव्या वेतन आयोगाचे लाभ न मिळाल्याने उपोषणास बसलेले तालुक्यातील प्राथमिक शिक्षक रमेश बुंदे (उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोळवली) यांनी शिक्षण विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले.

सातव्या वेतन आयोग न मिळाल्याने व या संदर्भात संबंधितांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करुन कोणतेही दखल घेण्यात न आल्याने न्याय मागणीसाठी बुंदे हे रितसर मार्गान उपोषणास बसले होते. तालुका शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी शिंदे यांनी या संदर्भात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने कामगार दिनी दुपारपर्यंत सुरु असलेले उपोषण मागे घेतले. यासंदर्भात शिक्षण विभागाच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 05/May/2025