‘सिंधूच्या प्रत्येक थेंबावर आमचा हक्क आहे’ : पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ 

India-Pakistan :ऑपरेशन सिंदूरमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला तरी पाकिस्तान पुन्हा-पुन्हा भारताला युद्धाची धमकी देत ​​आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणतात की, भारत आम्हाला सतत धमकावत आहे.

पण जर पुन्हा युद्ध झाले, तर आम्ही भारताला धडा शिकवू. कधी ते म्हणतात की, गोळ्यांनी उत्तर देऊ, तर कधी पाणी रोखण्याची धमकी देतात. पण, सिंधू नदीच्या प्रत्येक थेंबावर पाकिस्तानचा हक्क आहे, अशी मुक्ताफळे शरीफ यांनी उधळली.

शहबाज शरीफ पुढे म्हणाले की, सिंधू नदीच्या पाण्यावर पाकिस्तानचा हक्क आहे. आम्ही १९६० मध्ये सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली होती. आता, भारत आम्हाला पाण्यासाठी दिवसरात्र धमकावतो. या युद्धापूर्वी ज्या पद्धतीने धमक्या देत होता, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले आहेत. आता, जर त्यांनी आणखी काही केले तर, आम्ही त्यांना धडा शिकवू, असेही ते यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या विधानाची भीती
अलीकडेच पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानला धमकी वजा इशारा दिला होता. ‘चुपचाप भाकरी खा, नाहीतर माझी गोळी तर आहेच’ असे मोदी म्हणाले होते. पंतप्रधान मोदींच्या या विधानाची भीती स्पष्टपणे दिसून येते. शाहबाज शरीफपासून ते बिलावल भुट्टोपर्यंत सर्वजण मोदींच्या या विधानावर टीका करत आहेत. शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानमधील भाषणादरम्यान मोदींच्या या विधानाचा उल्लेख केला, तर बिलावल भुट्टो अमेरिकेत मोदींच्या नावाने आरडाओरड करत आहेत.

Radhakrushna patapedhi

बिलावलची अमेरिकेतून चर्चेची मागणी
बिलावल भुट्टो पाकिस्तानच्या एका शिष्टमंडळासह अमेरिकेत पोहोचले आहेत आणि यादरम्यान त्यांनी भारताशी चर्चेची विनंती केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 04-06-2025