दापोली : दापोली शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी नगरपंचायतीने रात्री खड्डे बुजवले, मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी प्रश्नांची सरबती करत नगरपंचायतीच्या कारभाराची पोलखोल केली. २६ ऑगस्टला रात्री साडेआठच्या सुमारास कंत्राटदाराकडून दापोली शहरातील रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम सुरू होते तेव्हा हा प्रकार घडला.
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगरपंचायतीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम रात्री साडेआठनंतर सुरू केले. रात्रीच खड्डे भरले तर गणेश चतुर्थीच्यादिवशी आणि उत्सव काळात नागरिकांना दिलासा देता येईल. मात्र रात्रीच्या अंधारात खड्डे भरण्याचे काम सुरू असताना दापोली तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर दापोलीकडे काही कामानिमित्त येत होते. त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी खाली उतरून कामगारांकडे चौकशी केली. त्यावर रात्री काम करत आहेत, याबाबत त्यांच्याकडे उत्तर नव्हते. ही सारी धूळफेक कशासाठी आणि कुणासाठी करता आहात. सक्षम अधिकाराच्या उपस्थित खड्डे बुजवण्याचे काम होणे अपेक्षित असताना त्यांच्या अनुपस्थित काम करण्याची घाई केली जात आहे, या वेळी उबाठा तालुकाप्रमुख गुजर यांनी कामगारांची हजेरी घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 28-Aug-25














