Ganesh utsav: रत्नागिरी बाजारात गौराईचे मुखवटे; खरेदीसाठी गर्दी

रत्नागिरी : लाडक्या गणरायाचे आगमन बुधवारी मोठ्या जल्लोषात होणार असून, गणेशभक्त गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. गणरायाबरोबरच गौरीचेही घरोघरी आगमन होते. गौराई सणानिमित्त लागणाऱ्या विविध साहित्यासह गौरी शंकर पूजेचे मुखवटे आणि दागिन्यांच्या स्वरूपात बदल झाला आहे. पीओपी, पेपर पल्पपासून बनवलेले आकर्षक, हलके आणि टिकाऊ मुखवटे पर्याय म्हणून उपलब्ध आहे. मुखवटे खरेदीसाठी महिलांनी रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे.

रत्नागिरी शहरातील बाजारपेठ मारूती मंदिर, आठवडा बाजारासह रामआळी, मारुती आळी तालुक्यातील विविध वाजारपेठेत मुखवटे, गौराईसाठी लागणारे स्टैंड व विविध साहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे.यावेळी हौसे असल्यामुळे नवीन लग्न झालेल्या मुलींची बाजारात लाडू, जिलेबी, चकली, चिवड्यासह विविधप्रकारची मिठाई, केळी, सफरचंद, चिक्कू, डाळिंब, मोसंबीसह विविधप्रकारची पाच फळे लागतात. मिठाई, फळे खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. हौसे पुजनासाठी लागणारी छोटी व मोठी सुपांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पारंपरिक पद्धतीची सुपे खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे.

पूजनासाठी गौरीची मूर्ती, कमळाची फुले, आंब्याची पाने, धूप, उंच दिवे, कापूर, तांदूळ, सुपारी, सुका मेवा यासारख्या साहित्यांची आवश्यकता असते. यंदा मिठाई, फळे यासह मुखवट्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. याचा फटका भक्तांना बसत आहे.

गौराईचे विविध मुखवटे
चिनीमातीसह पितळी, चांदी, सोन्याचे मुखवटा असतात. अंगणातील तुळशीसमोर पूजा करून गौरीला घरात घेतात. गौरीच्या आगमनानंतर संध्याकाळी भाजी-भाकरी नैवैद्य दाखवितात. गौरीला उभे करतात. दुसऱ्या दिवशी सकाळ, संध्याकाळ असे दोनवेळा पूजा करावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 28-Aug-25