khed : घेरारसाळगडवासियांनी बुजवले खड्डे

खेड : तालुक्यातील घेरारसाळगड गावातील पेठवाडी, तांबडवाडी व बौद्धवाडीतल्या ग्रामस्थांनी रविवारी श्रमदान करून आवळीचा पेडा ते रसाळगड किल्ला बसस्टॉप या दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवले. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात साईड गटारे गाळाने भरल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येत असून मोठमोठे खड्डे तयार झाले होते. त्यामुळे एस.टी. वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. जिल्हा परिषद बांधकाम विभागाला लेखी तक्रारी देऊनही शासनाने अद्याप दखल घेतली नाही.

अखेर ग्रामस्थांनी पुढाकार घेत रस्ता तात्पुरता दुरुस्त करून वाहतुकीसाठी मोकळा केला, या श्रमदानात नारायण सावंत, दगडू सावंत, शिवाजी सकपाळ, शांताराम सावंत, धोंडीराम आखाडे, गजानन सावंत, सुभाष सावंत, अनंत सकपाळ, रामचंद्र सावंत, रामचंद्र कोंडीराम आखाडे, परशुराम जाधव, सुरेश सावंत, रामचंद्र सावंत आदी ग्रामस्थांचे योगदान राहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 28-Aug-2025