मंडणगड : मंडणगड बस स्थानक परिसर पूर्णपणे खड्डेमय झाला असून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. राज्य परिवहन खाते व मंडणगड चे आगारप्रमुख याबाबत मुग गिळून गप्प असल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मंडणगड शहर हे तालुक्याचे ठिकाण असून सध्या या ठिकाणी अनेक अति महत्वाच्या व्यक्तींचं दौरे सुरु आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या ठिकाणी मंडणगड बस स्थानक आहे. या बस स्थानक परिसरात काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र डांबरी कारणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहे. प्रवाशी व इतर नागरिकांचे या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. जवळपास अर्ध्या बस स्थानक परिसरात मोठ मोठे खड्डे असून या खड्ड्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे स्थानक प्रमुखांनी तत्काळ लक्ष घालून हे खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे.
मंडणगड बस स्थानक परिसरात एकच सुलभ शौचालय असून ये जा करणारे प्रवाशी व शहरातील नागरिकांना याच शौचालयाचा आधार घ्यावा लागत आहे. या शौचालयातील घाण व सांडपाणी बाहेर वाहत असून बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे बस स्थानकाच्या शेजारीच जिल्हा परिषदेची अव्वल समजली जाणारी प्राथमिक शाळा इयत्ता १ ली ते ९ वी असून शेकडो विद्यार्थी या तालुका स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या आरोग्यावरही या दुर्गंधी मुळे परिणाम होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:36 PM 28-Aug-2025














