chiplun nagar prishad : चिपळूण नगरपरिषद प्रभाग रचनेबाबत पाच हरकती

चिपळूण : चिपळूण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक नियोजन अंतर्गत अंशतः फेरबदल करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर आजअखेर पाचजणांनी हरकती नोंदविल्या आहेत. त्यामध्ये माजी नगरसेवक किशोर रेडीज, बिलाल पालकर यांचा समावेश आहे. या सर्व हरकती प्रभाग क्र. ५ संदर्भात असून संबंधितांनी हरकती देताना काही सूचना नमूद केल्या आहेत.

सार्वत्रिक निवडणूक नियोजन अंतर्गत फेरबदल केलेल्या प्रभाग रचनेसंदर्भात निवडणूक नियोजनानुसार ठराविक कालावधीमध्ये नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या. या नुसार आजअखेर पाचजणांनी हरकती दिल्या आहेत. त्यामध्ये दोन माजी नगरसेवक, तर उर्वरित तीनमध्ये सचिन रमेश हातिस्कर, अभिषेक मयूर राजापूरकर व अनिकेत प्रविण ओतारी यांनी हरकती नोंदविल्या असून प्रभाग क्र. ५ संदर्भात या हरकती आहेत. या हरकतीनुसार या प्रभागात खाटीक गल्ली सोन्या मारूती/ओतारीगल्ली/प्रभात गल्ली हा परिसर पूर्वीच्या रचनेनुसार होता; मात्र १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केलेल्या प्रभागांनुसार प्रभाग क्र. ११ मध्ये हा परिसर समाविष्ट केला आहे. प्रत्यक्षात या परिसराचा समावेश प्रभाग क्र. ५मध्येच असायला हवा, असे पाचपैकी चौघांनी नमूद केले.

माजी नगरसेवक किशोर रेडीज यांनी प्रभागाचे नाव खंड बाजारपेठ असून प्रभाग ११ मध्ये नगर परिषद इमारत, छ. शिवाजी चौक ते प्रभात रोड, रंगोबा साबळे रोड, सोन्या मारूती, खाटीक गल्ली, दुर्गाळी, संसारे तिठा, खंड बावशेवाडी, कांगणेवाडी, स्वरविहार संकूल ते नगरपरिषद इमारत या भागांचा समावेश केला आहे. प्रभाग नाव रॉयलनगर आहे. प्रभाग १०मध्ये प्रथमेश अपार्टमेंट, सिद्धकला अपार्टमेंट ते अल्फा टॉवर ते महावीर मार्केट व शिव नदी भाग आहे. शिवाजी चौक ते प्रभात रोड हे नाव प्रभाग ११मधून कमी करून ते १० मध्ये समाविष्ट करावे, अशा हरकती घेण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 29-Aug-2025