khed : आजारपणाला कंटाळून वृद्धाची गळफासाने आत्महत्या

खेड : खेड तालुक्यातील सुकिवली ओझरवाडी येथे कॅन्सरच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका वृद्धाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सुधाकर शंकर साळुंखे (वय ६५, रा. सुकिवली ओझरवाडी) हे गेले चार वर्षे तोंडाच्या कॅन्सरने त्रस्त होते. सतत अस्वस्थ व बेचैन राहिल्यामुळे दि. २५ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा ते गळफास लावलेल्या अस्वस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी खेड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सुधाकर शंकर साळुंखे यांनी केलेल्या आत्महत्येमुळे सुकिवली परिसरातील ग्रामस्थांतून शोक व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 29-Aug-2025