रत्नागिरी : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा माहे सप्टेंबर २०२५ या कालावधीतील जिल्ह्यातील तालुका शिबीर दौरा जाहीर झाला आहे. तालुका शिबिर दौरा चिपळुण ९, १६, २३, ३० सप्टेंबर, खेड – ४आणि १८ सप्टेंबर, दापोली ३ आणि १७ सप्टेंबर, मंडणगड १० सप्टेंबर, गुहागर ११ सप्टेंबर, देवरुख २४ सप्टेंबर, लांजा २५ सप्टेंबर आणि राजापूर २६ सप्टेंबर २०२५ मोटार वाहन निरीक्षक हे जनतेच्या सोयीसाठी जिल्हा दौरा करणार आहेत. यावेळी शिबिर दौऱ्यांमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशानुसार कामे करण्यात येतील, असे कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 30-Aug-2025














